🕒 1 min read
सांगली: शासनाचे नियम झुगारून आज पहाटे पाच वाजताच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार करून दाखवली. दरम्यान यानंतर आमदार पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत असे काहीही नसते. गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान शर्यतीच्या ठिकाणी अजूनही पडळकर पोहचले नाहीत. याठिकाणी जाण्यासाठी ते निघाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजच्या शर्यतीला हजारोंच्या संखेने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी राज्य शासनाने याकडे लक्ष देत पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत भरण्यावर विचार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांचा फौजफाटा असूनही पहाटे पाचलाच पडळकरांची बैलगाडा शर्यत पार’
- टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”

