🕒 1 min read
सांगली: आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या आणि पोलिसांच्या मोठ्या विरोधानंतरही अखेर बैलगाडी शर्यत यशस्वी करून दाखवली. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही असा शासनाचा प्रयत्न होता तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकरानी घेतला होता. त्याप्रमाणेच आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन बैलगाडा शर्यत यशस्वी करून दाखवली. यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
अखेर पडळकर यांची बैलगाडी शर्यत राज्य सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून गनिमी काव्याने पार पडली. ग्रामीण महाराष्ट्राच्या जनभावनेचा अंदाजच महा विकास आघाडी सरकारला आलेला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेली ती बैलगाडी शर्यत नव्हती, तर जनभावनांचा उद्रेक होता. अशा शब्दांत भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
अखेर @GopichandP_MLC यांची बैलगाडी शर्यत राज्य सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बैलगाडी शर्यत गनिमी काव्याने पार पडली.
ग्रामीण महाराष्ट्राच्या जनभावनेचा अंदाजच महा विकास आघाडी सरकारला आलेला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेली ती बैलगाडी शर्यत नव्हती,जनभावनांचा उद्रेक होता. pic.twitter.com/YLGMwEKJ7S— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 20, 2021
दरम्यान पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवत बैलगाडा शर्यत पार करून दाखवली. आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर सकाळी शर्यती पार पडल्या. न्यायालयाने बंदी घातली असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार केल्या आहेत. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही शर्यती पार पडल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांचा फौजफाटा असूनही पहाटे पाचलाच पडळकरांची बैलगाडा शर्यत पार’
- टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
