Share

मी केवळ मराठवाड्याचा नाही तर महाराष्ट्राचा नेता– केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मराठवाड्याचेच नाही तर राज्यातील प्रलंबीत सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले. ‘जनआर्शिवाद’ यात्रेनिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. मी केवळ मराठवाड्याचा नेता नाही तर महाराष्ट्राचा नेता असल्याचेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्तांमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबीत विकास कामांचा प्रस्ताव तयार करायला लावणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठवायला लावून ती सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासानही त्यांनी दिले. मराठवाडाच नाही तर राज्यातील सर्व भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या विभागाला जास्त निधी द्यावा लागला असला तरी इतर मंत्रालयातील कामेही जास्त काळ खोळंबणार नाहीत, तसे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. देशात लसीकरण मोहिम मोदींच्या नेतृत्त्वामुळेच यशस्वी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. कोरोना नंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!