Share

पनवेलमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिम, सुरक्षा रक्षक आणि मोलकरणीचेही होणार लसीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दैनंदिन व्यवहारात नागरिकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येणाऱ्या घटकांच्या लसीकरणावर पनवेल महापालिका प्रशासनाने भर देत निराधार, बेघरांचे, शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतर आता पनवेल महापालिका सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवणार असल्याची माहिती पनवेल मनपाचे आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी दिली आहे.

मनपा क्षेत्रातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गृहसंकुलांतील सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच वंचित घटक ज्यांना कोरोना लस दिली गेली पाहिजे याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन आनंद गोसावी यांनी केले आहे.

दरम्यान लवकरच शाळा सुरु होणार असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षकांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याने वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गशर्नखाली लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान आता पालिकेने
सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!