🕒 1 min read
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची औरंगाबादच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिष्टमंडळाने प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या उपस्थित भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत ज्या सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही. त्यासुविधांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांना जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, कॉलेज मॅक्झिन शुल्क, संगणक शुल्क, वैद्यकीय मदत निधी, युथ फेस्टिवल, प्रयोगशाळा व ग्रंथालय इत्यादी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भातच्या सूचना महाविद्यालयांना दिलेल्या आहेत. तरी विद्यापीठाने तात्काळ या संदर्भात निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे अभाविपने केली आहे. तसेच वाणिज्य पदवी शाखेच्या प्रथम वर्ष प्रथम सत्र परीक्षेमध्ये विद्यार्थी मोठ्यप्रमानात विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे नापास झाले होते.
तदनंतर फेरतपासणी केल्यानंतर अडचण दूर होऊन त्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु त्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून त्या विषयाचे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे. ते शुल्क विद्यापीठाने योजना करून विद्यार्थ्यांना परत करावे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर मंत्री निकेतन कोठारी, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राजारामबापू यांचे स्वप्न पूर्ण ; जयंत पाटलांचा नागरिकांनी केला सर्वपक्षीय सत्कार
- चंद्रकांत खैरेंना पुन्हा हर्षवर्धन जाधव यांचे आव्हान, पुढील लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा
- लसींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी सीरमने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा – आव्हाड
- शिवन्यात ‘शिवसेना-युवासेना-महिला’ आघाडीची स्थापना; अब्दुल सत्तारांचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
