Share

‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती-बावनकुळे

Published On: 

मुंबई : सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यामुळे आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना प्रतिउत्तर देत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’अशी राज्य सरकारची सध्यस्थिती असून पवार यांनी इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी निधी मिळवून द्यावा असे म्हणत बावनकुळे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. डिसेंबरपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा देखील यावेळी बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारला दिला.

पुढे शरद पवारांवर टीकांचा वर्षाव सुरु ठेवत ते म्हणाले की,‘ ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने ताट वाढलेले आहेत. परंतु राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधलेत,तसेच ओबीसी आरक्षणाचे केंद्र सरकारने समोर केलेले ताट राज्य सरकार हिसकावून घेत आहे. पुढे बावनकुळे म्हणाले की ,’राज्य सरकार इम्पेरीकल डाटा गोळा करायला निधी आणि मनुष्यबळ देत नाही, शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला याबाबत निर्देश द्यावे’

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते की,’घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकलं असं लोकांचा गैरसमज झाला. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. १९९२ मध्ये ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. तसेच ५० टक्क्यांहुन जास्त आरक्षण देण्यात येणार नाही,असे सांगितले होते. केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली.

राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता असं केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. राज्यांना अधिकार दिले, जेवणाला निमंत्रण दिलं. पण हात बांधले आणि जेवा म्हणून सांगितले. केंद्र सरकारने अशा प्रकारे ओबीसींची फसवणूक केली आहे. या घटना दुरुस्तीने ओबीसींना काहीच मिळणार नाही असे देखील पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!