Share

कोविड प्रतिबंधाकरीता नागरिकांनीही प्रयत्न करावेत – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : चिकलठाणा येथील औरंगाबाद महानगरपालिका संचलित मेल्ट्रॉन हॉस्पीटल (डीसीएचसी) येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून, त्याचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी शासन उपाय योजना करत आहे. परंतु नागरिकांनीही कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. असे ठाकरे व्हिडिओ कॉन्फर्सिंग व्दारे म्हणाले. प्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, कोविड काळात आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येत काम केले. यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनासह खासगी क्षेत्रातील प्रत्येकाने सर्वतोपरी मदत केलेली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्स‍िजनची आवश्यकता राज्याला भासू लागली. याचा अनुभव लक्षात घेऊन राज्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर भर दिला. अनेक उद्योग समूह यासाठी पुढे आले. पालकमंत्री देसाई यांनी मनपाच्या मेल्ट्रॉन इमारत परिसरात सुरू झालेला ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्प, या रूग्णालयात अधिक सुविधेची भर घालणारा आहे.

या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरसाठी उद्योग विभागाने पुढाकार घेतला. जवळपास साडे सात हजारांहून अधिक रुग्ण याठिकाणाहून बरे होऊन गेले. नागरिकांनी या रुग्णालयातील सुविधेबाबत समाधानही व्यक्त केले, हीच या हॉस्पीटलच्या नागरिकांना दिलेल्या सेवेची पोचपावती आहे. तरीही नागरिकांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन गर्दीत जाणे टाळावे, शासनाने सूचविलेल्या सूचनांचे पालन करावे, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!