🕒 1 min read
मुंबई : वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. नुकतंच सोमय्या यांनी पुण्याच्या मावळमध्ये पत्रकार परिषदेत भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. गवळी यांनी केंद्र, राज्य सरकारसह बँकेचे रक्कम लाटली असा आरोप सोमय्यानी केला होता. हा गैरव्यवहार कसा केला, हे सोमवारी मुंबईत पुराव्यासह समोर आणणार असं ही सोमय्यानी जाहीर केले होते.
आता खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून तब्ब्ल ७ कोटी रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार १२ मे २०२० रोजी केली होती. त्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एवढी कॅश आली कुठुन, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आता दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर सोमय्या यांनी समोरासमोर यावं, असं आव्हान भावना गवळी यांनी देखील सोमय्या यांना दिलं आहे. भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून, त्यांच्या उपस्थितीत ७ जुलै २०१९ रोजी सकाळी ५ वाजता ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार वाशीम पोलीस ठाण्यात केली होती. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु’; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा
- ‘आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत’- तालिबान प्रवक्ते
- अफगाणिस्तानचे खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार ; एसआरएचने दिली महत्वाची माहिती
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा

