अहमदनगर : राज्यात सध्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा गाजत आहे. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं करून अनेक महिने उलटून गेले आहेत. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास अवाजवी विलंब लावला आहे, असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवले.
दरम्यान, न्यायालयाच्या सूचनेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोश्यारींवर खोचक टीकास्त्र सोडलं आहे. ‘राज्यपालांनी विधानसभेचे 12 आमदार लटकवून ठेवले होते. त्यावर उच्च न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे, असं सांगतानाच भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाटलं नसेल अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
पुढे ते म्हणाले, ‘विधान परिषद सदस्य नियुक्तीवरून भाजप नेते अमित शाह यांनी काल राज्यपालांना समज दिली असेल, असं सांगताानाच राज्यपालांनी किती अप्रतिष्ठा केली. 9 महिने झाले अजून निर्णय नाही. ती यादी आवडली नसेल तर पुन्हा पाठवा. आम्ही परत पाठवू. मात्र निर्णय घ्या. होय म्हणा किंवा नाही म्हणा, पण निर्णय घ्या,’ असं आवाहन देखील मुश्रीफ यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यामधील सर्व यंत्रणा सज्ज – पालकमंत्री सुभाष देसाई
- ‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- ‘युवकांना सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून ‘सत्यमेव जयते’चा नारा बुलंद करण्याचे बळ मिळावे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
