🕒 1 min read
नवी दिल्ली : फेब्रुवारी १९९७ मध्ये मंजुरी मिळालेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिली होती. मात्र, आजही म्हणजे २०२१ साली रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे बीडवासियांमधून कमालीची नाराजी आहे. परंतू बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या सातत्याने मार्गासाठी प्रयत्नशील आहेत.
त्यातच आज १२ ऑगस्ट रोजी प्रीतम मुंडे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. प्रकल्पासाठी आवश्यक राज्य सरकारच्या वाट्याचा निधी मिळत नसल्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामावर होणाऱ्या विपरीत परिणामाबाबत रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा केली. या प्रकल्पासंदर्भात रेल्वे विभागाची त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी व संबंधितांना सूचना करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले. या भेटीमुळे निश्चितच आपल्या रेल्वेमार्गाला गती मिळेल असा विश्वास प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला.
तसेच या प्रकल्पासंदर्भात रेल्वे विभागाची त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी व संबंधितांना सूचना करण्याची मागणी केली,यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले.या भेटीमुळे निश्चितच आपल्या रेल्वेमार्गाला गती मिळेल।
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) August 12, 2021
दरम्यान, परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूसंपादनाचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्राने ५२७ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी १०० कोटींचा निधी जुलै महिन्यात देण्यात आला होता.
या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंडे भगिनी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. तसेच रेल्वेमार्गाच्या कामामध्ये त्या जातीने लक्ष देऊन आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्या तत्परतेमुळे रेल्वेमार्गाला गती मिळत आहे. परंतु, हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्पष्ट बोलता न आल्याने मित्र चिडवाचे’; शरद केळकरने सांगितला अनुभव
- ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याइतपत राज्य सरकार बेपर्वा झालेय’, भाजपची टीका
- ‘विरोधकांनी देशाची माफी मागावी’, केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
- तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता
- ‘…याची उत्तरे द्या अन्यथा राजीनामा द्या’, पडळकरांचे मंत्री वड्डेटीवारांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
