Share

भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मागील काही आठवड्यांपासून राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आणि केंद्रीय मंत्र्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत विविध नेते हे दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत.

आता चर्चा मात्र केंद्रीय मंत्री अमित शाह आणि काँग्रेसमधून भाजपात उडी घेतलेल्या दोन दिग्गज पाटलांच्या भेटीची होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांची भेट होऊ शकली नसली तरी या दोन नेत्यांनी त्यांना गाठले. भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा अद्यापही सुरु असून आता या भेटीमुळे वेगळे तर्क काढले जाऊ लागले आहेत. पावसाळी अधिवेशनाचे कारण देत अमित शाह यांची भेट झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मात्र, देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे दोन नेते अमित शाह यांना भेटण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेस मध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना खास मान असायचा. मात्र, या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणूक देखील हरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला. तर, विखे पाटील यांच्या चिरंजीवांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. सुजय विखे पाटील हे खासदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले. यानंतर, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात जात पारंपारिक मतदारसंघातून विजय मिळवला.

दरम्यान, आता या दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांची भेट का घेतली याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. केंद्र सरकारने नव्या केंद्रीय सहकार खातं केलं असून शरद पवार यांच्यानंतर हे दोन्ही नेते याच खात्याच्या कारणास्तव शाह यांच्या भेटीला गेल्याच समोर आलं आहे. ‘देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी सहकारी कारखानदारी, सहकारी बँक आणि सहकार क्षेत्राशी संंबधित सर्वच प्रश्न आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली,’ अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!