🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. यामुळे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले कि, ‘भाजपकडून कालपर्यंत महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात होते. राज्याकडेच आरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झालं आहे. काल आम्हीही दुरुस्ती सूचवली. पण आमच्या दुरुस्तीला भाजप खासदारांनी समर्थन दिलं नाही,’ असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव आणि बादशाहचा म्युझिक व्हिडीओ व्हायरल
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
