Share

घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मंगळवारी १० जुलैरोजी राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आज या विधेयकासंदर्भात लोकसभेत चर्चा केली जाणार आहे. या विधेयकावर बोलण्यासाठी आपल्याला संधी द्यावी अशी मागणी भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आपल्याला राज्यसभेमध्ये मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात बोलण्याची संधी द्यावी असे पत्र उपराष्ट्रपतींना पाठवल्याचे संभाजी राजेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी जे जे वंचित आहेत त्यासर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली आणि तेच आमचं म्हणणं आहे. अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली आहे.

मंगळवारी, विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्रकुमार यांनी आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून संविधानाच्या दृष्टीने त्यावर सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे म्हटले. दरम्यान या विधेयकाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!