Share

आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

Published On: 

पुणे: आज रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक होत आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता चर्चा ,दिलासा नाही तर थेट निर्णय देण्याची आशा पुणेकर व्यक्त करत आहेत. निर्बंधामुळे व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. या अगोदर प्रशासनाचे नियम झुगारून व्यापाऱ्यांनी आंदोलन देखील केले. त्यामुळे आता यावर त्वरित निर्णय घेण्याची आशा पुणेकरांनी धरली आहे.

पुण्यातील निर्बंध कमी करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. मात्र, त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लेखी प्रस्ताव पाठविण्याची गरज नाही. अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होत आहे. त्यात निर्बंधाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार शहराचा प्रथम नागरिक या नात्याने प्रस्ताव पाठवला आहे. महापालिका प्रशासनाला ही भूमिका बंधनकारक आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा थेट निर्णय झाला पाहिजे, अशीच भूमिका मांडली जाणार आहे.असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!