🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ ७० धावांनी आघाडीवर होता. भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर अटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने एकही गडी न गमावता २५ धावा केल्या होत्या.
नॉटींगहम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी करत इंग्लंडचा डाव १८३ धावांवर अटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २७८ धावांची मजल मारली. यासह भारतीय संघाला पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या डावात सलामीवीर के एल राहुलने २१४ चेंडुचा सामना करताना १२ चौकारासंह सर्वाधीक ८४ धावांची अर्धशतकी खेळी केली. अष्टपैलु रविंद्र जडेजाने त्याला पुरेपुर साथ देत ८६ चेंडुत ८ चौकार आणि १ षटकारासंह ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली.
Persistent rain forces play to be called off in Nottingham.#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN1o5ml pic.twitter.com/mTXi4keVel
— ICC (@ICC) August 6, 2021
मधली फळी धावा जोडण्यात अपयशी ठरली असताना भारताच्या तळाच्या फलंदाजानी सामन्यात चांगला खेळ दाखवला. मोहम्मद शमीने १३ धावांचे आणि जसप्रीत बुमराहने ३४ चेंडुत ३ चौकार आणि १ षटकारांसह २८ धावांचे योगदान दिले. यामुळे भारतीय संघाला मोठी आघाडी घेता आली. इंग्लंडकडून पुनरागमन करणाऱ्या ओली रॉबीन्सनने सर्वाधीक ५ गडी बाद केले. जेम्स अँडरसनने ४ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचे सलामीवीर रॉरी बर्न्स(११) आणि डॉमीनीक सिब्ली(९) धावांवर खेळत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
