मुंबई : सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी काही वेळापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतील शाह यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्यात कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. कोवोवॅक्स या लसीबद्दल माहिती देताना त्यांनी ही लस भारतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटलंय. तसेच सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहेत. पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. त्या दोघांमध्ये 30 मिनिटे बैठक झाली.
अदर पूनावाला यांनी म्हटले की, सरकार आम्हाला पाठिंबा देतंय. कसल्याही प्रकारची आर्थिक अडचण नाही. मी पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. मोठ्यांसाठी कोवोवॅक्स ही लस ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी मला आशा आहे. आम्ही नेहमीच लस उत्पादक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात राहिलो आहोत. ते पुढे म्हणाले, कोवोवॅक्स ही दोन डोसची लस आहे. जेव्हा कोवोवॅक्स लाँच होईल तेव्हाच त्याची किंमत देखील लोकांना समजले. लहान मुलांसाठीची लस मार्च 2022 पर्यंत उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
तर सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- विद्यार्थ्यांचे ना लसीकरण, ना लोकल प्रवासास मुभा; मग सीईटी परीक्षा कशी घेणार ? : उच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
