मुंबई : गेल्या वर्षी पासून कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर मोठा परिणाम झाला असून प्रवेश प्रक्रियांबाबत देखील मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेताच अंर्तगत मूल्यमापन व आधीच्या वर्गातील गुण यांच्या आधारावर दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटीचा पर्याय देण्यात आला आहे. दरम्यान, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. मुंबईसारख्या शहरात प्रवासासाठी अद्याप लोकलने प्रवास करण्यास सर्वसामान्यांना मुभा नाही. यामुळे दळणवळणाची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत कान टोचले आहेत. ‘राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. लोकल प्रवास सामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा कशी घेणार ?,’ असा सवाल उच्च न्यालयाने राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे.
अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने सीईटी परीक्षा घेण्याबाबतचा परिपत्रकाविरोधात वडील ऍड. योगेश पत्की यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी कोरोना नियमांकडे लक्ष वेधत कोर्टाने सरकारला काही प्रश्न विचारले. सध्या राज्यात कोरोना नियमांत शिथिलता नाही. मुंबईत लोकलने सामान्यांना प्रवास करण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांचे सध्या लसीकरण झालेले नाही. त्यांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाही, त्यामुळे सीईटीचे नियोजन कसे कराल ? असा सवाल कोर्टाने केला. दरम्यान, राज्यात एकूण तब्ब्ल 10 लाख 98 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार? कॉंग्रेसचा सवाल
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
