🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे.
यावर कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी सोशल सोशल मिडीयावर पोस्ट करत नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरून मोदींना विरोधकांनी धारेवर धरले आहे.
मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार??
शहिद राजीव गांधी अमर रहे!
मेजर ध्यानचंद अमर रहे!!— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) August 6, 2021
दरम्यान, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. त्यांनी याची सुरूवात केलीच असेल तर आता नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांच्या नावाने असलेल्या स्टेडीयमचे नाव बदलावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मेजर ध्यानचंद यांचे नावा मोदींनी मुद्दाम राजकारणासाठी समोर आणले असा आरोप देखील होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
