🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टी मध्ये काम करणार अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. रितेश देशमुख नेहमी सोशल मीडियावर कमालीचे पोस्ट शेअर करत असतो. रितेशची पत्नी जिनिलिया सुद्धा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय दिसते. आज जिनिलियाचा वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CSLexOHjM0C/?utm_source=ig_web_copy_link
इनस्टाग्राम अकाऊंटवर रितेशने एक पोस्ट शेयर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!’, असे लिहिले आहे. तर पुढे एक व्हीडीओ शेयर करत लिहितो, तू दिवसेंदिवस आणखीनच तरुण दिसत आहे. लवकरच लोक म्हणतील, जिनिलिया सोबत हा काका कोण आहे?’. यावर अनेक लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत असून चाहत्यांनी जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या रितेशची ही पोस्ट बरीच व्हायरल होत आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात ‘क्यूट कपल’ आहे यात शंका नाही. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. मात्र नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि हे दोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांना आता दोन छान मुले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात बांग्लादेशची ऑस्ट्रेलियावर मात, ५ गडी राखुन केले पराभुत
- केंद्राने राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिल्यानंतर मराठा संघटनांची ९ ऑगस्टला पुण्यात बैठक
- कांस्यपदक विजेत्या संघातील खेळांडूसाठी पंजाब सरकारकडून १ कोटीचे बक्षिस जाहिर
- नेटकऱ्यांना मिळाला विषय! अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘गणेश चतुर्थीच्या आधी माझं गाणं येणार’
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ भारत इंग्लंड सामन्यातील रिकामी खुर्ची आणि तिची कहाणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
