Share

सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात बांग्लादेशची ऑस्ट्रेलियावर मात, ५ गडी राखुन केले पराभुत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेले १२२ धावांचे लक्ष्य बांग्लादेशने ५ गडी गमावत पुर्ण केले. यासह बांग्लादेशने पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकणऱ्या ऑस्ट्रेलियाने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला निर्धारीत २० षटकांत ७ गडी गमावत केवळ १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ४२ चेंडुत ५ चौकारासह ४५ धावांची सर्वाधीक खेळी केली. बांग्लादेशकडून मुस्तफिझुर रहमानने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १२२ धावांचे माफक आव्हान बांग्लादेशने १८.४ षटकात ५ गडी गमावून सहज पार केले. यासंह बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव केला. बांग्लादेशकडून या डावात अफिफ हुसैनने ३१ चेंडुत ५ चौकार आणि १ षटकारांसह सर्वाधीक ३७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या नाबाद खेळीसाठी त्याला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!