पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे ! त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे. मात्र, ट्रोलर्सना भाव न देता त्यांनी आपली कला जोपासणार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे. सध्या अमृता फडणवीस पुण्यात आहेत. त्यांच्या हस्ते एका हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी त्यांनी गणेश उत्सवानिमित्त नवीन गाणं घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान यावेळी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील निर्बंधनाबाबत सांगितले की, पुण्यात कोरोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. करोनाचे रुग्ण आता कमी झालेत. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. त्यामुळे याठिकाणी निर्बंध शिथिल करायला हवेत असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
त्यानंतर अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला असता अमृता फडणवीस यांनी ‘गणेश चतुर्थीच्या आधी माझं एक गाणं येणार आहे’, अशी माहिती दिली. अमृता फडणवीस या दरवेळी वेगवेगळी गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. परंतु प्रत्येक वेळी त्यांना त्यांच्या गाण्यावरून ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा लवकरच त्या गाणं घेऊन येत असल्याने नेटकऱ्यांना चांगलाच विषय मिळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

