🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला काल झालेल्या उंपात्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. यात तिला चायनिज ताईपाईच्या ताई झु यिंग कडून सलग दोन सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर कांस्य सामन्यात सिंधूने पुनरागमन करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे, यात तिने चीनच्या बिंग जिओ ही हीचा 21-13 21-15 असा पराभव केला आहे, यामुळे सलग दोन ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
तसेच २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत देखील सिंधूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावले. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती. शनिवारी उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्याने सिंधूला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावं लागलं. खणखणीत स्मॅशचे फटके हे सिंधूच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं.
डावखुऱ्या जिआओविरुद्ध खेळताना अचूक डावपेचांसह खेळताना सिंधूने तिला सतत निरुत्तर केलं. पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-0 अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर बिंगने चांगलं प्रत्युत्तर देत 5-5 अशी बरोबरी केली. सिंधूने तडाखेबंद स्मॅशेसच्या बळावर 11-8 अशी आघाडी घेतली. चांगला खेळ कायम करत सिंधूने 15-9 अशी आघाडी वाढवली. उत्तम बचावाचं प्रदर्शन करत सिंधूने 18-11 अशी बढत घेतली. नेटजवळून शिताफीने फटके लगावत, ड्रॉप शॉटचा हुशारीने उपयोग करत सिंधूने पहिला गेम 21-13 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने 4-1 अशी खणखणीत आघाडी घेतली. क्रॉसकोर्ट स्मॅशच्या बळावर सिंधूने 11-8 अशी आघाडी वाढवली.
बिंगने सिंधूवर जोरदार आक्रमण करत स्मॅशेसचा मारा केला. बिंगने ड्रॉप शॉट आणि नेटजवळून चांगला खेळ करत 11-11 अशी बरोबरी केली. सिंधूने रॅलीचा वेग नियंत्रित करत बिंग आगेकूच करणार नाही याची काळजी घेतली. दुसरा गेम गमावल्यास सामना गमावण्याची भीती लक्षात घेऊन बिंगने पल्लेदार रॅली खेळण्यास सुरुवात केली. मात्र सिंधूने फटक्यातली अचूकता वाढवत बिंगला निष्प्रभ करत बाजी मारली.
महत्त्वाच्या बातम्या
- सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या स्थानकातून १७३ किलो ‘कॉपर’ची चोरी, औरंगाबाद रेल्वेस्थानकाची सुरक्षा ऐरणीवर!
- केंद्र सरकारचे उत्पन्न वाढले, जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ३३ टक्क्यांची वाढ
- ‘हम दो, हमारे दो की सरकार’, राहुल गांधींच्या मोदींना ‘फ्रेंडशिप डे’च्या खोचक शुभेच्छा
- एमपीएससीच्या रिक्त जागा तातडीने भरा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या; औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा संताप!
- …तर पुण्यातील दुकाने परस्पर संध्याकाळपर्यंत उघडी ठेऊ; व्यापारी महासंघाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
