नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी लसीकरणाच्या मु्द्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती’ असे म्हटले होते. ‘कुठे आहे लस?’ असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला होता. ही गोष्ट भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली होती.
त्यानंतर आज ‘फ्रेंडशिप डे’चे निमित्त साधत राहुल यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्यात. ‘हम दो, हमारे दो की सरकार’ असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना मैत्री दिनाच्या खोचक शुभेच्छा दिल्या.
https://www.instagram.com/reel/CSBS9bihGQz/?utm_source=ig_web_copy_link
राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत मोदी हे उद्योगपती अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार उद्योगपतींच सरकार असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. एका फोटोत नरेंद्र मोदी गौतम अदानी यांच्यासोबत विमानात दिसत आहेत. त्यानंतर मुकेश अंबाना आणि गौतम अदानी यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. या व्हिडिओला अवघ्या काही तासातच हजारोंच्या संख्येनं लाईक्स आले. त्याचबरोबर अनेकांनी टीका करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्यात. कमेंट्समध्ये काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत


