Share

केंद्र सरकारचे उत्पन्न वाढले, जीएसटी संकलन एक लाख कोटींवर, ३३ टक्क्यांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर संकलनात केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात एकूण १,१६,३९३ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. त्यापैकी २२,१९७ कोटी रुपये सीजीएसटी तर २८,५४१ कोटी रुपये एसजीएसटीच्या माध्यमातून जमा झाले आहे तर आयजीएसटीच्या माध्यमातून ५७,८६४ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये आले आहेत. ही आकडेवारी एक जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१ दरम्यानची आहे.

मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा जुलै २०२१ मधील महसूल ३३% अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल ३६% अधिक राहिला आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या या स्रोतातील महसुलापेक्षा ३२% अधिक राहिला.

जीएसटी संकलन सातत्याने आठ महिन्यांपर्यंत १ लाख कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक झाल्यानंतर जून २०२१ मध्ये कमी होऊन १ लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावरून खाली आला. जून २०२१ महिन्यात संकलन बऱ्यापैकी मे २०२१ चे असते. मे २०२१ च्या दरम्यान बहुतांश राज्य / केंद्रशासित प्रदेश हे कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने बाधित, तसेच पूर्ण किंवा अंशतः टाळेबंदीच्या अवस्थेत होते. कोविड संबंधी असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै २०२१ मध्ये जीएसटी संकलन पुन्हा १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचाच हा एक संकेत म्हणता येईल. आगामी महिन्यांमध्ये देखील जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलै २०२० मधील जीएसटी महसुलाचे संकलन १२,५०८ कोटी रुपये होते, तर जुलै २०२१ मधील जीएसटी महसुलाचे संकलन १८,८९९ कोटी रुपये झाले. यामध्ये ५१% वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!