मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह राज्यातील होमगार्ड्सने देखील ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून काम केले. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील होमगार्ड्सना मानधन मिळालेले नाही. या मुद्यावरुन भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर टीका करताना ते म्हणाले की, ‘राज्यातल्या ४२ हजार होमगार्ड्सवर मानाधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात वेठबिगारासारखे राबवून घेतल्यावर देखील ४ महिने मानधन नाही, भत्ते नाहीत. इतके निलाजरे सरकार यापूर्वी महाराष्ट्राने कधीच बघितले नव्हते.’
कोरोना संकटाच्या काळात अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी भरती करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असल्यामुळे त्यांनाही कामावरुन कमी करण्यात आले आहे. त्यांचा मुद्दा सध्या गाजत असताना होमगार्ड्सना देखील अद्याप मानधन देण्यात आलेले नाही. यावरुन आता राज्य सरकारवर चांगलीच टीका होत आहे. राज्य सरकारकडे पैसा नसल्यामुळे होमगार्डचे मानधन थकले असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच हा निधी वर्ग करण्यात येणार असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- संजयजी मी राणीच्या बागेतील पेंग्वीनबद्दल बोलतीये…तुम्हाला कुठला पेंग्विन वाटला ?
- ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार,नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात घोषणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

