Share

‘नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे पूरग्रस्तांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.

पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

त्यांच्या या आवाहनाला त्यांच्या घरातूनच हरताळ फासलं जात असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेच या(शरद पवार यांच्या) आवाहनाला बगल देत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यासह रोहित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. ‘सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे,’ असं भाष्य नितेश राणे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!