🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा येथील पाटण दौऱ्यावर आले होते. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने आगमन केले.त्यामुळे हवामान खराब असल्याने येथील दृश्यमान कमी झाल्याने हेलीकॉप्टर लँडिग रद्द करण्यात आले.आणि मुख्यमंत्री परत पुण्याकडे रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. आता यावरूनच भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे.
महाड, चिपळूण, सातारा मुख्यमंत्री रोज एक दौरा करत आहेत. मात्र चारच्या आत घरी जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकप्रकारे इंस्टॉलमेंटवर आधारितच दौरे केले आहेत. त्यामुळे अशा दौऱ्यापेक्षा एकाच दिवशी सर्व दौरे आटोपून सरकारी पैसे वाचवता आले नसते का, असा सवाल करत मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
महाड, चिपळूण, सातारा…. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी दररोज एक दौरा केला आणि चारच्या आत घरी परतले. महाराष्ट्र आपत्तीच्या दरडी खाली आला असताना असे हे इंस्टॉलमेंटमध्ये दौरे होतायत. हे एकाच दिवशी आटोपून सरकारी पैसे वाचवता आले नसते का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 26, 2021
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाड, चिपळूण या ठिकाणी दौरा करत या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या भागातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. २६ जुलैरोजी ते पाटण येथील नागरिकांशी संवाद साधणार होते. मात्र लँडिग न करताच त्यांनी पुण्याकडे आपला ताफा फिरवला. त्यामुळे भाजपच्या अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बावनकुळे मित्रा, बढाया नको मारूस; भाजपाने साधे तुला तिकिटही दिले नाही’
- ‘योद्धा जेव्हा शरण येत नाही…’, आ.धसांनी महिलेचे हॉटेल पाडल्यानंतर समर्थकांची पत्रकबाजी
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
