🕒 1 min read
लातूर : लातूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्रासमोर एक दुचाकी ट्रकखाली येऊन दुचाकीवरील पती पत्नी जगीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त ट्रक व दुचाकीवरील तिघेजण औश्याकडे एकाच दिशेने जात होते. ओव्हरटेक करताना हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कर्नाटकमधील वांजरखेड तांडा (ता.भालकी, जि. बिदर) येथील राजाभाऊ राठोड (४६), त्यांच्या पत्नी सखुबाई (४०) व मुलगी स्वाती राठोड (१७) हे तिघेही लातूरमध्ये राहत असलेले त्यांचे जावई अमोल लक्ष्मण राठोड यांच्याकडे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. तो कार्यक्रम आटोपून शुक्रवारी ते तिघेही दुचाकीवरुन (एमएच २४ एसी ८९०३) परत आपल्या गावी निघाले होते.
त्यावेळी लातूरहुन सोलापूरकडे ट्रक (टीएन ३४, एझेड २००८) हा जात होता. या ट्रकला ओव्हरटेक करताना रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे त्यांचा तोल गेला. त्यात दुचाकीवरील तिघेही ट्रकच्या चाकाखाली अडकले. या अपघातात शकुबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी असलेल्या वडील व मुलीस लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता राजू राठोड यांचा मृत्यू झाला. मुलगी स्वाती (१७) ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या मार्गाने काम सुरू असल्याने एकाच लाईनवरून वाहनाची ये-जा आहे. त्यातच पावसाने खड्डे पडलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच; सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण
- ‘पेगासस प्रकरणी गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा’, राहुल गांधींची मागणी
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- तळई दुर्घटना; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

