🕒 1 min read
नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून भारतातल्या ४० पेक्षा अधिक लोकांवर पाळत ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हेरगिरीच्या प्रकरणाने देशात एकच खळबळ उडवून दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर उघडकीस आलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलंय.
शुक्रवारी संसद परिसरात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आपला फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे. हा केवळ आपल्या खासगी आयुष्याच प्रश्न नाही तर हे जनतेच्या आवाजावर आक्रमण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
#PegasusSnoopgate देशद्रोह का मामला है।
हमारी सीधी सी माँग है- सुप्रीम कोर्ट की निगरानी में इसकी न्यायिक जाँच हो ताकि देश को पता चले कि ये देशद्रोह किसके कहने पर किया गया- PM या HM? pic.twitter.com/65A3aIb4XQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2021
इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगासस हे एक शस्त्र आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी करत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरात आंदोलनही केलं. यावेळी, काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाळ, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी तसंच काँग्रेसचे अनेक खासदार उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- तळई दुर्घटना; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

