औरंगाबाद : कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून शहरातील सर्व सरकारी कार्यालयात बाहेरुन येणाऱ्या अभ्यागतांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय, पोलिस आयुक्तालय आरटीओ कार्यालय या सर्व ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांची चाचणी केली जाते. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण निघत असतांना महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मनपा मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज २०० ते ३०० जणांचा राबता असताना दररोज केवळ ४ ते ५ जणांची चाचणी होत आहे. त्यामुळे मनपाच्या या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत असेल याचा अंदाजा येतो.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण निघत होते. या पार्श्वभूमीवर संसर्गाला थांबवण्यासाठी मनपा प्रशासनाने वर्दळीचे आणि नेहमीच सामान्य नागरिकांचा राबता असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा मुख्यालय, पोलिस आयुक्तालय, आरटीओ कार्यालय याठिकाणी बाहेरून आत प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. सुरुवातीला प्रत्येकाला थांबवत कडक पद्धतीने तपासणी मोहीम राबवण्यात आली. मात्र ठराविक कालावधीनंतर सर्वच कार्यालयांमध्ये हि विशेष मोहीम बारगळली. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात १८, मनपा मुख्यालयात ४, पोलीस आयुक्तालयात १८ अशा पद्धतीने चाचण्या सुरु आहेत.
याबरोबरच विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात ४, आरटीओत १२ जणांच्या चाचण्या गुरुवारी करण्यात आल्या. मनपाच्या मुख्य इमारतीमध्ये तर समोरून प्रवेश करणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्या इतकी आढळून आली. मात्र त्या तुलनेत मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या मनपा इमारत टप्पा क्रमांक ३ मधून वरती गेल्यास शहर अभियंत्यांचे कार्यालय आहे. यासमोरून गेल्यावर सदर इमारत आणि मनपा मुख्यालय यांना जोडणाऱ्या स्काय वॉक मधून थेट महापालिकेच्या मुख्य इमारतीत जाता येते. अनेक जण याचा वापर करून मनपात मागच्या दरवाज्याने जातांना आढळून आले. त्यामुळे या अँटिजेन कोरोना चाचणीच्या निर्णयाचा नेमका किती आणि कसा फायदा होतोय हे यानिमिताने दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- फर्दापूर येथील १०८ लाभार्थी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या उपक्रमांतर्गत अनुदान वाटप
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

