Share

फर्दापूर येथील १०८ लाभार्थी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या उपक्रमांतर्गत अनुदान वाटप

Published On: 

औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदिवासी खावटी अनुदान योजने अंतर्गत दि.२२ गुरुवार रोजी फर्दापूर (ता.सोयगाव) येथील आदिवासी कुटुंबांना किराणा सामान व कडधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी फर्दापूर येथील १०८ आदिवासी तडवी भिल्ल कुटुंबातील पात्र लाभाथ्र्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना अर्थसाहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आदीवासी खावटी अनुदान योजना महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय जाहीर करुन या योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबाला ४ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार राज्यात आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या अमलबजावणीची सुरुवात करण्यात आली.

या पाश्र्वभूमीवर फर्दापूर येथील तडवी भिल्ल समाजाच्या १०८ पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंबांना  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आदिवासी विकास प्रकल्प विभाग औरंगाबाद यांच्या वतीने मटकी,चवळी,हरबरा,वटाणा,तूरडाळ,उडीद डाळ, हे कडधान्य व मीठ,गरम मसाला,शेंगदाणा तेल,मिरची पावडर,चहा पावडर,साखर असे प्रत्येकी १८ किलो किराणा सामानाच्या किट वाटप करण्यात आल्या.

दरम्यान, आदिवासी खावटी अनुदान योजनेअंतर्गत फर्दापूर येथील १०८ पात्र आदिवासी कुटुंबांच्या बँक खात्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदानाची रक्कम या अगोदरच जमा करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्प तसेच औरंगाबादचे माध्यमिक शिक्षक डि.आर महाले यांनी यावेळी दिली. फर्दापूर येथील पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप करतांना सरपंच शकीलाबी शेख हुसैन माजी जि.प सदस्य डि.एफ सोनवणे आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादचे डि.आर महाले,व्हि.आर चव्हाण ग्रा.पं सदस्य भीमराव बोराडे,फिरोज पठाण,गुलाब बर्डे सामाजिक कार्यकर्ते शेख शेख जाकेर आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!