Share

कोरोना नियमांचे उल्लंघन; आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : इंधन दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यभर निषेध केला जात आहे. सोलापुरात महिला काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाई वर संताप व्यक्त करण्यात आला. आणि चक्क पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल पाठवण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदेसह एनएसयुएच्या कार्यकर्त्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील सुपर पेट्रोल पंपावर हे आंदोलन दि. १६ रोजी करण्यात आले होते. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यभर केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. काल सोलापुरात महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील सुपर पेट्रोल पंपावर आ. प्रणिती शिंदे याच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडिया समोर यायला घाबरतात अशी टीकाही आ.शिंदे यांनी केली होती.

या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १८६,१८८,२६९,३३६ अंतर्गत आ.शिंदे व एनएसयुआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!