🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.
पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींनी संवाद साधला. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात असून १ तासाच्या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रातील चर्चेसोबतच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील वाढलेला तणाव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सातत्याची गैरसमज करणारी विधाने यामुळे सरकारबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
अशातच, राज्यासह केंद्रातील भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. तर, पवार-मोदी भेटीमुळे उत्सुकता अधिक वाढली आहे. या भेटीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता कमी आहे. या तिन्ही पक्षांना वेगळं होण्याची भीती आहे. तसं झाल्यास त्यांच्यासाठी ते खूप वाईट होईल. त्यामुळेच ते एकत्र आहेत,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
यासोबतच, ‘ही भेट नॉर्मल असून काही घडलं असल्यास मला माहित नाही. अधिवेशनापूर्वी मोठी नेते एकत्र येऊन चर्चा करतात. नव्यानं तयार झालेल्या सहकार खात्यावर शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाली असावी,’ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचे राजकीय फलित काय?
- पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार, नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार
- मोदींच्या भेटीबाबत खुद्द शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
