Share

‘मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही’

Published On: 

🕒 1 min read

वाराणसी – उत्तर प्रदेशमधील करोना हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. उत्तर प्रदेश सरकारने करोनाची दुसरी लाट अभूतपूर्व पद्धतीने नियंत्रणात आणली, असे पंतप्रधान म्हणाले.वाराणसीतील आयआयटी- बीएचयू मैदानावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही पंतप्रधानांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. उत्तर प्रदेशात आज कायद्याचे राज्य आहे. एकेकाळी नियंत्रणाबाहेर असलेल्या माफियाराज आणि गुंडगिरीवर आता कायद्याचा वचक आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश हे उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचं एक महत्त्वाचं राज्य बनलं आहे असं देखील प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं.

मोदींनी योगींचे कौतुक केल्यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून योगींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचं क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात, लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!