Share

अनिल देशमुखांविरोधात ईडीची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक केली आहे.

तर, अनिल देशमुख यांच्या विविध मालमत्तांवर ईडीने छापेमारीला सुरुवात केली होती. आता अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. याआधी अनिल देशमुख यांच्या मुलासह पत्नीला देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं.

यानंतर ईडीने मालमत्तेच्या जप्तीची कारवाई ही देशमुखांना मोठा धक्का मानला जात आहे. ईडीने ट्विटद्वारे आज केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पण या मालमत्तेत नेमकं काय-काय आहे याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!