Share

केदार शिंदेने सुरेखा सीकरी यांना ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘बालिका वधू’ फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे वयाच्या ७५ वर्षी  निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान केदार शिंदे यांनी देखील एएनआयचे ट्विट शेअर करत, अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. याआधी 2018 मध्येही त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे सुरेखाजींना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या होत्या. मात्र त्यांना पूर्वी सारखे काम करणे जमत नव्हते.

‘बालिका वधू’ या मालिकेमधील ‘दादी मां’ ही भूमिका त्यांची प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून घराघरात पोहचल्या होत्या. तसेच त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सुरेखा यांना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड देखील मिळाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!