मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता. या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, यानंतर मुख्यमंत्र्यांचे कौतुक काहीजण करत आहेत तर काहीजण आता मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. आता मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. ‘पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोडची मिसळ जगात भारी पुण्याची मस्तानी जगात भारी चितळेंची बाकरवडी जगात भारी तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री जगात भारी.’ असा टोला देशपांडे यांनी ट्वीट करून लगावला आहे.
तर भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील.’ असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने वारीला परवानगी नाकारणे हा हिंदूंच्या आस्मितेवर घाला’
- पंकजा मुंडेंनी समर्थकांना समजावले, पण त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांचे काय झाले?
- एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
