Share

भाजपची तिरकी चाल; नितेश राणेंची मुंबई महापालिका निवडणूक कोअर कमिटीवर वर्णी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे कट्टर विरोधक असणाऱ्या भाजपचे नेते नारायण राणे यांची केंद्रात वर्णी लागली असून केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंना मंत्रिपद दिले असल्याची चर्चा सुरु असताना आता दुसरीकडे आता नारायण राणेंचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या कोअर कमिटीवर घेण्यात आले आहे.

काल भाजपच्या कोअर कमेटीची आज मुंबईत बैठक झाली. यात भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूक कोर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.या कमेटीत भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असून मुंबई भाजपा प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, सुनील राणे, अमित साटम, प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेत्यांचा या कमेटीत समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या कोर कमिटीच्या नेत्यांचा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, याआधी नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांच्यावरही भाजपने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. निलेश राणे यांची थेट प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंबाला शिवसेनेच्या विरोधात उतरवण्याची रणनीती भाजपने आखाली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!