🕒 1 min read
अलिबाग – अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. दरम्यान, मधुकर ठाकूर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. माजी आमदार मधुकर ठाकूर हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आजारी होते. मधुकर ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला ग्राम पंचायतीपासून सुरुवात केली. अलिबागमधील तत्कालिन झिराड ग्रामपंचायती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग थेट विधानसभेपर्यंत मजल मारली.
मधुकर ठाकूर यांनी 2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. राजकीय कारकीर्दीत मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवलं. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवलं.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- ‘महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची ‘प्रतिक्षा” ; बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर
- ‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा’
- ‘आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच झालयं…’


