🕒 1 min read
मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकाला तीन महिन्याचा अवधी बाकी आहे. सर्व संघानी या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत संघबांधणीसाठी अनेक खेळाडूंना पारखुन बघण्यात येत आहे. यादरम्यान भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार यावर मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे.
यादरम्यान चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर भारताचा माजी क्रिकेटपटु आणि समालोचक आकाश चोप्राने मत मांडले आहे. चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात दोन खेळाडुंचे नाव समोर येत आहे. पहिले नाव श्रेयस अय्यरचे आणि दुसरे नाव सुर्यकुमार यादवचे. श्रेयस अय्यर हा गेल्या काही कालावधीपासुन भारतीय संघाचा नियमीत सदस्य राहिला आहे. अय्यरने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासुन तो दुखापतीमुळे क्रिकेटपासुन दुर आहे.
तर दुसरा पर्याय सुर्यकुमार यादव. सुर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध पदार्पणात चांगली खेळी करत अनेकांचे लक्ष वेधले होते. तसेच युएईमध्ये आयोजीत आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्सकडुन चांगली कामगिरी केली होती. आणि यंदाचा टी-२० विश्वचषक हा युएईमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्यालाही संधी दिली जाऊ शकते. मात्र आकाश चोप्राने अनुभव जास्त असल्यामुळे श्रेयस अय्यरचा विचार चौथ्या क्रमांकासाठी करावा असे सुचवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पेालिसांची भरती – दिलीप वळसे-पाटील
- इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ रनआऊटमुळे वाद सुरू
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी


