सांगली : गेल्यावर्षी पासून कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे. ठाकरे सरकारच्या अपयशामुळेच राज्यात कोरोनाचा प्रसार फोफावला आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
‘महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची देशाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केलं आहे. राज्यात ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहते. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे,’ अशी टीका भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगत बियाणे, पीक विमा अशा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे देखील शेलार म्हणाले. केंद्र सरकारने दिलेल्या लशी लोकांना देण्यात नियोजन न झाल्यान हेे केंद्र सरकारला दोष देतात. हे दुटप्पी सरकार आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडल पाहिजे, असंही शेलार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- हृदयद्रावक! मोठ्या बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशीच गच्चीवरून पडून दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
- महाराष्ट्राला मोठा दिलासा : आज तब्बल १५,२७७ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

