Share

महाराष्ट्राला मोठा दिलासा : आज तब्बल १५,२७७ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी

Published On: 

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्याची दिवसभराची कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात त्यानुसार आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पट आहे. त्यामुळे राज्याच्या रिकव्हरी रेटमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 60 पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 603 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत

तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे. राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर मुंबईत गेल्या 24 तासात 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,120 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 926 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!