🕒 1 min read
मुंबई : नोकरभरतीमधील भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील पदभरती महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या पोर्टमध्येच मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे पोर्टल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पोर्टल बंद करुन लवकरच नवीन पोर्टल सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र निर्णयाला वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला असून ठाकरे सरकार विद्यार्थ्यांची प्रतिक्षा विसरले असल्याचा आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला आहे.
सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केले होते. तसेच नव्या पोर्टलसाठी निवीदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली होती. तसेच हे महापोर्टल बंद व्हावे यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी देखील निवेदने दिले होते.
महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विसरलं की विद्यार्थी जवळपास दीड वर्ष नवीन प्रणालीची वाट बघतायत. pic.twitter.com/lZTMaAzDI9
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 12, 2021
फेब्रुवारी २०२० मध्ये बंद करण्यात आलेले पोर्टल अद्याप सुरू करण्यात आलेल नाही. त्यामुळे नीलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विसरलं की, विद्यार्थी जवळपास दीड वर्ष नवीन प्रणालीची वाट बघतायत.’
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

