🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सदस्य तथा खासदार इम्तियाज जलील यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणेतंर्गत वक्फ मिळकतीचे बोगस कागदपत्रे, अवैध व बेकायदेशिररित्या नियमबाह्य खरेदी – विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांवर ज्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन वक्फ बोर्डाचे बोगस कागदपत्रे नोंदणीकृत दस्तावेज बनविण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या वक्फ बोर्ड, दुय्यम निबंधक कार्यालय, महसुल विभाग व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुध्दा कायदेशिर कार्यवाही करुन विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी तक्रार थेट ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय वक्फ बोर्ड कायदा व महाराष्ट्र शासनाच्या कायदा व नियमानुसार वक्फ बोर्डाची कोणतीही मालमत्ता / मिळकत कोणत्याही कारणास्तव: अथवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला / संस्थेला विक्री, दान, गहाण, साठेखत इत्यादी प्रकारे हस्तांतरण करताच येत नाही. फक्त ११ महिनेच मर्यादित काळेपुरते सामाजिक कामाकरिता वापरासाठी भाडेतत्वावर देण्यात येते परंतु त्यासाठी सुध्दा वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ५१ नुसार वक्फ मालमत्तेची आणि विशेषत: स्थावर मालमत्तेबाबत भाडेपट्टे किंवा इतर प्रकारे हस्तांतरण हे पुर्णत: बेकायदेशिर असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमुद केलेले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या तक्रारीत बदलापूर प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआर मध्ये नमुद केलेल्या मुद्यांचा उल्लेख केला, त्यामध्ये १) दस्त क्र. ८११८/२०११ अन्वये दुय्यम निबंधक कार्यालय, उल्हासनगर – २ येथे साठेखत नियमबाह्य व बेकायदेशिररित्या नोंदणीकृत करण्यात आले २) बोगस नाहरकत प्रमाणपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद या पदाचा खोटा व बनावटी रबरी शिक्का तयार करणारे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खोटी सही करणारे ३) खोटे व बनावट नाहरकत प्रमाणपत्र बनविण्यासाठी कागद पुरविणारे, प्रिंटिंगसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य आणि कॉम्प्युटर ऑपरेटर ४) श्री.कृष्णा भास्कर निमसाखरे यांच्याकरिता आदेश पारीत करणेकामी एक लाख रुपये प्रति एकरप्रमाणे लाचेच्या स्वरुपात पैसे घेणारे श्री. ज्ञानेश्वर खुटवळ ५) वक्फ मालमत्तेमधील इतर अधिकारातील नावे ७/१२ मधुन कमी करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयाची लाच स्विकारणारे तलाठी व मंडळ अधिकारी ६) वक्फ मिळकतीच्या ७/१२ मधील इतर अधिकारातील नावे कमी झाल्यानंतर ठराव पास करण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे जामा मस्जिद ट्रस्टचे सर्व सदस्य मंडळ ७) खोटे व बनावटी नाहरकत प्रमाणपत्र बनविण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आवक-जावक क्रमांक रजिस्टरचा नमुना, रबरी शिक्का आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या नमुन्याची वक्फ बोर्ड कार्यालयातुन पुर्तता करुन सहकार्य करणारे वक्फ अधिकारी व कर्मचारी ८) सदरील संपुर्ण वक्फ मिळकतीचे बोगस कागदपत्रे, नियमबाह्य, अवैध व बेकायदेशिररित्या खरेदी – विक्रीच्या व्यवहाराचे संपुर्ण ज्ञान असतांना सुध्दा जाणुनबुजुन नजरअंदाज करुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे
दुय्यम निबंधक कार्यालय, महसुल विभाग, वक्फ बोर्ड कार्यालय व इतर शासकीय कार्यालयाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांनी मदत व सहकार्य केल्यानेच शासनाची व वक्फ बोर्डाची फसवणुक झाल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणुन त्यांच्यावरही विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी तक्रार ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

