औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोमवारपासून (दि.१२) आणखी नऊ सिटी बस प्रवाशांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एकूण ४१ स्मार्ट सिटी बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावायला तयार आहेत. यामुळे नवीन मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर महापालिका औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ८ जून पासून सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ८ बस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आली. आता सोमवारपासून यात आणखी नऊ बसेसची भर पडत आहे. ९ बस वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे देण्यात आली. नव्या मार्गांवर प्रवासी संख्या वाढणार आहे.
यात नवे मार्ग क्रमांक २५ सिडको ते रांजणगाव मार्गे हर्सूल टी पॉइंट, दिल्लीगेट, मध्यवर्ती बस स्थानक या मार्गांवर पहाटे सव्वा सहाला पहिली बस असेल. तर शेवटची बस रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी असेल. मार्ग क्रमांक २२ सिडको ते रांजणगाव मार्गे बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक असेल. मार्ग क्रमांक १५ सिडको ते रांजणगाव मार्गे टीव्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कूल, मध्यवर्ती बस स्थानक असा प्रवास करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रवासादरम्यान मास्क वापरणे, शासकीय आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, आवश्यक असल्याचे शहर बस विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये – बाळासाहेब थोरात
- राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणे अवमान; पण गुन्हा नाही
- ‘नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मी फोन केला होता, पण…’
- वारकरी पताका घेऊन पंढरीत; शासनाने मज्जाव केल्यानंतर देखील पायी वारी झालीच
- धक्कादायक : महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंटस, अवघ्या ५ दिवसात झाला मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

