पंढरपूर : राज्यात कोरोनाची लाट काहीअंशी ओसरल्याचे दिसत आहे. मात्र तरीही कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला पायी वारी काढण्यास शासनाने मज्जाव करण्यात आला आहे. यानंतर देखील शेकडो वारकरी ८ दिवसात देहू आणि आळंदी येथून पायी वारी करीत पंढरपूरला पोचले आहेत.
बंडातात्या कराडकर याना जरी शासनाने स्थानबद्ध केले असले तरी त्यांची पताका व ताल घेऊन समर्थक वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत . कोरोना संकटामुळे पायी वारी नाही असा आदेश शासनाने काढला असून 17 ते 25 जुलै कालावधीसाठी संचारबंदी लागू केली आहे . मात्र शेकडो वर्षांपासून घरात वारी असणारे पारंपरिक वारकऱ्यांनी आपला पायी वारीचा नियम न मोडता देहू आणि आळंदी येथून पायी वारी चालत पंढरपूर गाठले आहे .
हे निष्ठावान वारकरी आळंदी आणि देहू येथून आठ दिवसात पायी चालत पंढरपूरमध्ये पोचले आहेत . पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर याना प्रस्थानादिवशी प्रशासनाने नजरकैद केल्याचा आरोप करीत त्यांचे समर्थक वारकरी बंडातात्या यांची पताका आणि टाळ पायी चालत पंढरपूर पर्यंत आणून त्यांचा पायी वारीचा संकल्प पूर्ण केल्याचे भानुदास वैराट यांनी सांगितले. पंढरपुरात शिखराचे दर्शन घेऊन हे वारकरी परत आपल्या गावाकडे परतत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

