Share

धक्कादायक : महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन व्हेरिएंटस, अवघ्या ५ दिवसात झाला मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे. देशातील बर्‍याच राज्यामध्ये या व्हायरसचं आगमन झालं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट पसरत आहेत.

अशात आता एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एकाच महिलेमध्ये कोरोनाचे दोन वेगवेगळे व्हेरिएंट आढळून आले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संशोधकांची चिंताही वाढली आहे. संशोधकांच्या मते, ही प्रकरणं कोरोनासोबतचा लढा आणखीच अवघड करू शकतात. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, 90 वर्षाच्या या महिलेमध्ये एकाचवेळी अल्फा आणि बिटा हे कोरोनाचे दोन व्हेरिएंट आढळले.

या महिलेनं लस घेतलेली नव्हती आणि घरीच तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती जास्त बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सुरुवातीला महिलेची ऑक्सिजन पातळी चांगली होती.

मात्र, नंतर तिची तब्येत बिघडत गेली आणि पाचव्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयातील स्टाफनं महिलेला कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता, हे तपासण्याचा प्रयत्न केला असता यात दोन व्हेरिएंट आढळून आले. तिला अल्फा आणि बिटा व्हेरिएंटची लागण झाली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!