अहमदनगर : नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेत तुम्ही आघाडी किंवा युती होणार का याची चिंता करु नका. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
या शक्यतेवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धवजी यांनी नेमंक काय सांगितलं आहे हे मला माहिती नाही. पण मी इतकं सांगू इच्छितो की, मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार हे सरकार करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे लोकांमध्ये सरकारबाबत इतकी नाराजी आहे की जर निवडणूक झाली तर हे सरकारचं धाराशाही होईल.’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
यावर आता महसूलमंत्री आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा असते पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय आणखी तीन वर्ष चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये’ असे थोरात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे – उदय सामंत
- ‘माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील’ ; राठोडांचे सूचक विधान
- मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच बीड नंतर नगरमधील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे !
- ‘या’ अभिनेत्रीमुळे हर्षवर्धन कपूरच्या हातातुन निसटला हॉलिवूडपट, स्वत:च केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

