🕒 1 min read
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.
यानंतर, राज्यातील विविध नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर शिवसेनेनं त्यांचं अभिनंद करतानाच मिळालेल्या खात्यावरून चिमटा देखील काढला. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याचं समोर आलं आहे. मात्र, या त्यांच्याशी बोलणे झालं नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. नवी पेठ येथील मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर तुम्ही शुभेच्छा दिल्या का ? असा सवाल पत्रकारांनी राज ठाकरेंना केला. यावर, ‘नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. तसंच उद्या-परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल,’ अशी माहिती देखील ठाकरेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे – उदय सामंत
- ‘माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील’ ; राठोडांचे सूचक विधान
- मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच बीड नंतर नगरमधील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे !
- ‘या’ अभिनेत्रीमुळे हर्षवर्धन कपूरच्या हातातुन निसटला हॉलिवूडपट, स्वत:च केला खुलासा


