बुलढाणा :वारकरी संप्रदायाचे उगमस्थान ज्ञानेश्वर माऊलींचे जन्म ठिकाण आपेगाव येथील दिंडी प्रस्थान सोहळ्याला परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्धार केलाय. त्यामुळे राज्यातील एकाही वारकऱ्याची आत्महत्या झाली तर हे पाप महाराष्ट्र सरकारचे असेल, असा इशारा आझाद हिंद संघटनेने दिला आहे, आणि आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला परवानगी द्यावी यासाठी संपूर्ण राज्यभरातून संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येत आहे.
तर, महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे वारकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सरकारच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरणे दुरापास्त होईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील वीस दिंडी सोहळ्यांना ज्याप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सामील होण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे शासकीय गँजेटवर 842 वर्षाची परंपरा असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमी आपेगाव संस्थानला परवानगी देण्यात येण्याची मागणी आता जोर धरत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे – उदय सामंत
- प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेच्या आईचे निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- अन् केंद्राने ट्विटरला आणले वठणीवर ; ट्विटरकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! औरंगाबादेत लवकरच सुरु होणार शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

